विठु माऊली मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता अजिंक्य राऊत लवकरच पुन्हा एकदा आपल्या भेटीस येतोय.अजिंक्यची मन उडु उडु झालं ही नवी मालिका झी मराठीवर सुरु होणारेय. अजिंक्यने मालिकेचा प्रोमो शेअर करत नवी मालिका ‘मन उडु उडु झालं’ ३० ऑगस्टपासून सोम ते शनि संध्या. ७:३० वा. अशी कॅप्शन दिलीये. मालिकेत तो नव्या लूकमध्ये नव्या अंदाजात दिसणारेय. त्याचा हा नवा लूक चाहत्यांना आवडलाय. सोबतच या मालिकेत तो अभिनेत्री ऋता दुर्गुळेसोबत स्क्रीन शेअर करेल. अजिंक्य राऊत- ऋता दुर्गुळे ही जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणारेय. या दोघांच्या जोडीवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. एका चाहत्याने कमेंट केलीये की, विठू माउली आणि फुलपाखरू डायरेक्ट एकत्र...तर हिरो पण छान हिरोईन पण छान आय होप स्टोरी पण छान असेल अरे यार पण उडू उडू अशी आणखी एकानं कमेंट केलीये. या फ्रेश जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसतेय. ऋता आणि अजिंक्यचे चाहते ते पुन्हा छोट्या पडद्यावर झळकणार यासाठी खूपच उत्सुक आहेत.
Chitralivo
#HrutaDurgule #AjinkyaRaut #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber